गावागावातुन
पारगाव लोणी रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू
निरगुडसर (राजु देवडे)
पारगाव कारखाना ( ता.आंबेगाव ) पोलीस ठाण्याचे हद्दीत पारगाव – लोणी रस्त्यावर लबडेमळा या ठिकाणी चारचाकी कार व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकी चालक सुरेश महादु भोजणे ( वय ५५) रा. जारकरवाडी, भोजनदरा ( ता. आंबेगाव) यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पाठीमागे बसलेली त्यांची पत्नी राजश्री सुरेश भोजणे (वय ५० ) या जखमी झाल्या आहेत. याबाबत मुलगा अजय सुरेश भोजने यांनी पारगाव ( कारखाना) पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून वॅगनार कार चालक निलेश कैलास सुक्रे रा. खडकवाडी ( ता. आंबेगाव) याच्यावर पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पारगाव ( कारखाना) पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिं (६) रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पारगाव लोणी रोडवर सुरेश भोजने त्यांच्या ताब्यातील हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल एम एच १४ डी व्हीं ९३७१ याच्यावर त्यांची पत्नी राजश्री भोजणे हिला घेऊन जाकरवाडी येथे येत असताना लोणी बाजुकडून येणाऱ्या कार वॅग्नर गाडी एम एच १४ जे एक्स २८३७ या गाडीचा चालक निलेश कैलास सूक्रे याने नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीचे बाजूने येत भोजणे यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात सुरेश महादु भोजणे व राजश्री सुरेश भोजणे यांच्या डोक्याला, हाता, पायाला गंभीर जखमा झाल्या होत्या यात सुरेश भोजणे हे मयत झाले आहेत तर राजश्री भोजने या गंभीर जखमी झाल्या आहेत. पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे स.पो.नि. लहु थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सांगडे या घटनेचा पुढील तपास करत आहे.