गावागावातुन
पोंदेवाडी(ता.आंबेगाव)गावासाठी असणाऱ्या तलाठी कार्यालयात केलेला बदल रद्द करुन. खडकवाडी ऐवजी लाखणगाव येथेच तलाठी कार्यालय ठेवावे अशी सरपंच निलम वाळुंज व पोंदेवाडी ग्रामस्थांची मागणी
निरगुडसर( राजु देवडे)
पोंदेवाडी (ता. आंबेगाव)या गावाला नवीन नियमानुसार.महसूल विभागाने तलाठी कार्यालयाच्या ठिकाणात बदल केले असून.पोंदेवाडी गावाला पूर्वी असणारा लाखणगाव सजा तलाठी कार्यालय या ऐवजी खडकवाडी सजा तलाठी कार्यालय देण्यात आलेले आहे. परंतु दळणवळणाच्या दृष्टीने खडकवाडी गाव अडचणीचे ठरत असल्याने. महसूल विभागाने केलेला बदल रद्द करुन .जुन्याच पद्धतीने लाखनगाव सजा तलाठी कार्यालय ठेवावे अशी मागणी पोंदेवाडीच्या सरपंच निलम वाळुंज यांनी उपविभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव यांच्याकडे केली आहे.
आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी या गावाचे तलाठी महसुली कार्यालय बदलण्यात आले असून पोंदेवाडी गावासाठी पुर्वी लाखनगाव येथे तलाठी कार्यालय होते व पारगाव या ठिकाणी मंडळ अधिकारी कार्यालय होते.परंतु नवीन बदलानुसार पोंदेवाडी गावाला खडकवाडी या ठिकाणी तलाठी सजा कार्यालय देण्यात आले असुन पारगाव मंडल कार्यालय ठेवण्यात आले आहे. परंतु खडकवाडी गाव हे पोंदेवाडी ग्रामस्थांच्या दृष्टीने दळणवळणाच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच लाखनगाव तलाठी कार्यालय पोंदेवाडीसाठी असावे.अशी माघणी पोंदेवाडी ग्रामस्थांची आहे.
पुर्वी लाखनगाव व पोंदेवाडी एकच गाव होते नंतर ग्रामपंचायत वेगळी झाल्याने पोंदेवाडी स्वतंत्र झाले. परंतु पोंदेवाडेचा सबंध दळणवळण व सर्व गोष्टींनी लाखनगावशी आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या पोंदेवाडी व लाखनगाव अशा दोन्ही ठिकाणी आहेत. त्यामुळे प्रशासनाने केलेला बदल रद्द करून पुर्वी प्रमाणेच पोंदेवाडी गावासाठी तलाठी महसुली कार्यालय लाखनगाव येथे ठेवावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने होत आहे. याबाबतचे निवेदन पोंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच निलम अनिल वाळुंज यांनी उपविभागीय अधिकारी आंबेगाव जुन्नर व राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे