गावागावातुन
आंबेगाव तालुक्यातील प्रति भीमाशंकर श्री वेळेश्वर देवस्थान
शब्दांकन ह.भ.प.मधुकर महाराज गायकवाड पत्रकार गावडेवाडी
आंबेगाव तालुक्यातील प्रति भीमाशंकर श्री वेळेश्वर देवस्थान म्हणजे निसर्गाने मुक्त हाताने केलेली उधळण हिरवेगार सुंदरतेने नटलेले डोंगर नागमोडी वळणे असलेला घाट या सह्याद्रीच्या रांगांमध्ये हे वेळेश्वराचे अतिसुंदर प्रतिभीमाशंकराचे स्थान वसलेले आहे जेवढे सुंदर तेवढेच दुर्लक्षित व पावित्र्य असलेले हे स्थान आहे.
आंबेगाव तालुक्याच्या मंचर शहराच्या दक्षिणेला साथ किलोमीटर अंतरावर पेठ गाव व तेथून पश्चिमेला ५ कि.मी. कुरवंडी गावच्या सीमेवर अगदी हाकेच्या अंतरावर सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात श्रीवेळेश्वर हे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे .निसर्गाच्या कुशीत असलेले हे वेळेश्वर येथे पुरातन महादेव मंदिर आहे शेकडो वर्षांपूर्वी कोणी स्थापन केले हे अज्ञात आहे मात्र भावडी येथील ह.भ.प.नामदेव महाराज वाळके यांनी येथे ४० वर्षा पूर्वी येऊन सातगाव पठारच्या ग्रामस्थांच्या व महाराष्ट्रातील अनेक भाविकांच्या मदतीने लोकवर्गणीतून या शिवमंदिराचा भव्य जीर्णोद्धार केला आहे.
जवळच कमला मातेचे ही मंदिर आहे या मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे या वेळेश्वराच्या डोंगरावर गेल्यावर वरून दऱ्याखोऱ्यांचे विहंगम दृश्य दृष्टीस पडते पावसाळ्यात येथे मोठा पाऊस व धुक्याने हा परिसर धोक्यात हरवून जातो वन विभागाने येथे पशुपक्षी निरीक्षणासाठी मचान व लहान मुलांसाठी खेळणी उभारली आहेत या जंगलात मोर हरीण बिबटे हे प्राणी नजरेस पडतात येथे लोकवर्गणीतून भक्त निवासाचे काम सुरू आहे पिण्यासाठी पाण्याची विहीर व तिला स्वच्छ व सुंदर नितळ पाणी आहे.
राम मंदिर व विशेष आकर्षक असलेली लक्ष वेधून घेत असलेली दीपमाळ आहे वन विभागाने रस्त्याला दिलेल्या परवानगीमुळे व रस्ता थेट शिव मंदिराजवळ जात असल्याने पर्यटकांचा वाढता ओघ या ठिकाणी दिसून येतो.दुचाकी चार चाकी गाड्या येथे थेट येत असल्याने भाविकांची व पर्यटकांची वाढती गर्दी होत आहे .विशेष म्हणजे साधना करणाऱ्यांसाठी येथे दोन डोंगरात कोरलेली ध्यान मंदिरे (गुहा ) आहेत भाविकांना या गुहेत बसून साधना अनुभवता येते व ध्यान करता येते पर्यटकांनी या क्षेत्राचे पावित्र्य राखावे अशी आवाहन वेळोवेळी कोल्हारवाडी येथील वाळके बाबांचे शिष्य हभप दत्तात्रय महाराज रुकारी हे करतात व तसे अवाहन व प्रयत्नही ते सदोदीत करतात.
श्रीवेळेश्वर येथे प्राचीन शिवमंदिर व कमला मातेचे मंदिर आहे निसर्ग सौंदर्याने नटलेले या ठिकाणी हे ठिकाण लोकवर्गणीतून व ग्राम सहभागातून सुशोभित केले आहे येथे दररोज सकाळी संध्याकाळी नित्य पूजाअर्चा होते
ह भ प नामदेव महाराज वाळके मठाधिपती वेळेश्वर संस्थान.
शब्दांकन ह.भ.प. मधुकर महाराज गायकवाड गावडेवाडी.