गावागावातुन

धामणीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने ज्ञानज्योती शिक्षण व आरोग्य संस्थेच्या वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

Published

on

निरगुडसर ( राजु देवडे )

धामणी (ता.आंबेगाव) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३वी जयंती व ज्ञानज्योती शिक्षण व आरोग्य संस्थेचा ५ व्या वर्धापन दिन सोहळ्या निमित्त २६ ते २८ डिसेंबर २०२३ रोजी तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील ४५ शाळांमधील ११५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या जयंती सोहळ्याचे जि . प.प्राथमिक शाळा धामणी ता.आंबेगाव येथे आयोजन करण्यात आले होते.

वकृत्व स्पर्धा निकाल
गट क्र . १ – (१ली ते ४थी)
१) स्वरा प्रविण जाधव (प्रथम)
२) अर्ष अक्षय काळे ( द्वितीय )
३ ) स्वरा संदीप वाळुंज (तृतीय )
४ ) वैष्णवी विनोद जाधव ( उत्तेजनार्थ )

गट क्र २(५ वी ते ७ वी)
१ ) कु. गेजगे यशवंत हिंदुराव (प्रथम )
२ ) कु. गवंडी समृद्धी राजेश (द्वितीय )
३ ) कु. काळे पूर्वा स्वप्नील (तृतीय )
४ ) कु . महिमा सचिन रोडे (तृतीय )

गट क्र . ३( ८ वी ते १० वी)
१) कु. इगवले सानिका अमोल (प्रथम )
२) कु . सैद इश्वरी हेमंत (द्वितीय )
३ ) कु . पोखरकर दिक्षा ज्ञानेश्वर (द्वितीय )
४ ) कु . बारवे रसिका संतोष (तृतीय)
५ ) कु . थोरात श्रेया शौलेश (तृतीय)

गट क्र . ४ (११ वी ते १२ वी)
१ ) कु. जाधव संस्कृती योगेश (प्रथम )
२ ) कु. शेख सानिया इम्तियाज (द्वितीय )
३ ) कु. हाडवळे राजश्री राजेंश (द्वितीय )
४ ) कु. चासकर अदिती संजय (तृतीय )
५ ) कु.थोरात सानिका संदिप (तृतीय)

विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी मुलींनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उलगडला.
यावेळी डायनॅमिक भोसरी रोटरी क्लबचे अधक्ष ज्ञानेश्र्वर विधाटे,माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, सरपंच रेश्मा बोऱ्हाडे ,विलास पगारिया ,शांताराम जाधव,बबन भूमकर,वसंत जाधव, बाळासाहेब तुकाराम विधाटे,खडकवाडी माजी सरपंच अनिलशेठ डोके माजी सरपंच सागर जाधव ,पोलिस पाटील सुरज जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब कदम ,सोसयटीचे चेअरमन कोंडीभाऊ सबाजी तांबे , शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य डी.आर.गायकवाड , जि.प.प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा कथले ,कैलास महाराज सुक्रे , संस्थेच्या अध्यक्षा सुनीता विधाटे, उपाध्यक्ष प्रदिप भूमकर , संचालक किशोर विधाटे ,चंद्रकला भुमकर ,अक्षय विधाटे, प्रसाद विधाटे ,रोहित भूमकर , योगेश जाधव, राजाराम विधाटे, बाळासाहेब विधाटे, अमोल जाधव, व ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी उपस्थीत होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय विधाटे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version