गावागावातुन
मांदळेवाडी ता.आंबेगाव येथील मोनिकाची ” पी.एस.आय .” पदाला गवसणी
निरगुडसर: राजु देवडे
मूलीला अधिकारी झालेल बघायचय हे आई वडिलांनी व आजी आजोबानी पाहिलेल स्वप्न.ते स्वप्न गाठण कठीण होत.पण अवघडही नव्हते आणि ते ध्येय होते.आणि त्यासाठी स्व :ताला अभ्यासात झोकून देऊन मांदळेवाडी (ता.आंबेगाव )येथील मोनिका मांदळे यांनी पी.एस.आय पदाला गवसणी घातली.
मांदळेवाडी ता.आंबेगाव या गावतुन स्पर्धा परीक्षेत मोनिका मांदळे या यशस्वी झाल्या आहेत .सदैव पाचवीला पूजलेला दुष्काळ आणि त्यामुळे आईवडीलांना आणि आजोबा आजीला करावे लागणारे अपार कष्ट आणि त्यातूनच जिद्द निर्माण झाली.आणि काही तरी करायचे ?हे ठरले.
इयत्ता नववी पर्यंत मांदळेवाडी या ठिकाणी शिकत असताना दहावीला असताना येथील विद्यालय विद्यार्थी संख्येअभावी स्थलांतरीत झाले.त्यामुळे मोनिका ला दहावीला जवळच असणार्या वडगावपीर येथे दहावीला प्रवेश घ्यावा लागला. दहावीला चांगल्या गूणांनी पास झाल्यावर. तळेगाव दाभाडे येथे तीन वर्षाचा आय टी डिप्लोमा केला.व नंतर वाघोली येथे आयटी मध्येच डिग्री २०१८ मध्ये चांगल्या गुणांनी पास झाली. घरची परिस्थिती बेताची ? पण अधिकारी होण्याचे स्वप्न होते. आणि त्यासाठी घरच्यांनी पाठिंबा दिला आणि पुणे येथे २०१८ पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला.अभ्यास सुरु असताना २०२० मध्ये कोरोनासारखा महाभयंकर आजार आल्यामूळे स्पर्धा परिक्षांना ब्रेक लागला.आणि मोनिका ला पुन्हा घर गाठावे लागले. पण स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरूच ठेवला आणि २०२१ मध्ये झालेल्या पीएसआय परिक्षेत मोनिका उतीर्ण झाली.
विशेष म्हणजे ती पहिल्याच प्रयत्नात उतीर्ण झाली.या परिक्षेत मुख्यपरिक्षेत २५९ , मैदानी चाचणीत ८६ , आणि मुलाखतीत १८ गूण मिळवून मोनिका मांदळेवाडी सारख्या ग्रामीण भागातून पी।एस.आय. परिक्षा पास होणारी पहिली मूलगी ठरले आहे.यासाठी तिला आई,वडील, आजोबा,आजी,भाऊ,वहिनी व क्लासचे अध्यापक यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले.
जिद्द,चिकाटी,आत्मविश्वास मनामध्ये असेल तर आपणाला काहीच अशक्य नाही.ग्रामिण भागातील विद्यार्थी सुद्धा कोठे कमी नसतात पण त्यांनी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे.तसेच अभ्यास करताना मोबाईलचा वापर गरजेपुरताच केला.तसेच गावाचे उत्सव, इतर समारंभ मी मात्र जाणीवपूर्वक टाळले.वडील राजाराम मांदळे व आई रोहिणी मांदळे यांच्या पाठिंब्यामुळेच मी यश मिळू शकले.आणि अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यता उतरवले.असे मोनिका सांगते.