शैक्षणिक
जारकवाडी जि.प.प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी
निरगुडसर (राजु देवडे)
जारकवाडी ( ता. आंबेगाव ) येथील जि.प.प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आलि स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बुधवार ( दि.३) रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
शाळा, महाविद्यालये, विविध संघटना, सरकारी कार्यालये, राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.
जारकवाडी येथील जि.प.शाळेत
इ. दुसरीच्या वर्गातील विद्यार्थीनी शरण्या संदीप वैद हिने या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.सदर कार्यक्रमाप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर भाषणे केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ.सातवीच्या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक म.वि.काळे, जि.प.शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होत.