गावागावातुन
अष्टविनायक महामार्गावरील पारगाव कारखाना येथील दिशादर्शक फलकावरील दिशा चुकल्याने प्रवाशांची होतेय फसगत.
निरगुडसर (राजु देवडे)
ओझर रांजणगाव या अष्टविनायक महामार्गाचे काम काही दिवसांपूर्वी पुर्ण झाले असुन या रस्त्यावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अष्टविनायक महामार्ग आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातून जातो. पारगाव ता.आंबेगाव गावाजवळील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे. या फलकावर मंचर आणि निरगुडसर गावाकडे जाणारा जो दिशादाखवनारा बाण आहे. तो चुकीचा आहे.
मंचर निरगुडसरकडे जो दिशादर्शक बाण आहे तो रस्ता पाबळ, लोणी श्री क्षेत्र खंडोबा धामणी, जारकवाडी या गावांकडे जानारा रस्ता आहे. त्यांमुळे या चुकलेल्या दिशादर्शक फलकामुळे बाहेरील नागरिकांची दिशाभूल होऊन फसगत होत आहे.
नवीन येणा-या नागरिकांना या परिसराची भौगोलिक माहिती नसते. सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेल्या दिशादर्शक फलकाच्या आधारेच अनेकजन आपला मार्ग शोधत येतात.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने चुकीचा दिशादर्शक फलक काढुन त्या ठिकाणी योग्य तो दिशादर्शक फलक लावला अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.