सामाजिक

विविध मागण्यासाठी रेशन दुकानदारांचे धरणे आंदोलन

Published

on

निरगुडसर (राजु देवडे)
देशासह महाराष्ट्रातील रेशनिंग दुकानदार संघटनांनी ( दि.१) रोजी धरणे आंदोलन केली.आंबेगाव तालुक्यातील रेशनिंग दुकानदार संघटनेच्या वतीने. आंबेगाव तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंबेगाव तालुक्यातील रेशनिंग दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील जवळपास ६० वर्षापासून कार्यरत असणाऱ्या व दुष्काळ, साथीचे आजार, भूकबळी कोविड सारख्या जागतिक महामारीच्या काळात अतिशय प्रभावीपणे केंद्र व राज्य शासनाचा एक हक्काचा घटक म्हणून तळागाळातील सर्वसामान्यापर्यंत थेट पोहचणारी व्यवस्था म्हणून यशस्वी ठरलेल्या रेशन वितरण व्यवस्थेचा प्रमुख घटक असणाऱ्या दुकानावरच आता उपासमारीची वेळ आली आहे.

रेशनिंग दुकानदारांच्या अनेक मागण्या असुन • कमीशन वाढ झाली पहिजे,रेशन दुकानदारांना निश्चित उत्पन्नाची हमी, धान्या बरोबर डाळ तेल सुरू करा,डी.बी.टी. सुरू करु नका, अनेक वर्षापासून बंद असलेली केरोसीन दुकान पूर्ववत करा, अन्न धान्य चांगले दर्जाचे ज्युट बॅग मधून देण्यात यावे, कालबाह्य झालेली ईलेक्ट्रीक मशीन बदलून अत्याधुनिक मिळावेत. महागाई प्रमाणे कमीशन ३०० रु. मिळावेत इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहे.

यावेळी सदर मागण्यांचे निवेदन तहसीलदार संजय नागटिळक यांनी स्विकारले .
गेली अनेक वर्षापासून रेशनिंग दुकानदार तुटपुंज्या कमीशनवर दुकान चालवत आहे, त्यामध्ये दुकानदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अन्नधान्य वितरणासाठी शासनाने दुकानदारांना इ पाॅस मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु त्या मशीन कालबाह्य झालेल्या. नवीन अत्याधुनिक मशीन उपलब्ध करून द्यावेत व शासनाने रेशनिंग दुकानदारांच्या मागणीकडे लक्ष द्यावे.अशी माघणी यावेळी करण्यात आल्याचे रेशनिंग दुकानदार संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष सुरेश घोलप यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version