सामाजिक
तहसील कार्यालय आंबेगाव ( घोडेगाव ) येथे राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा.
निरगुडसर प्रतिनिधी
राजु देवडे
तहसील कार्यालय आंबेगाव ( घोडेगाव ) येथे राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
24 डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.
हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले होते. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळाले यात सुरक्षेचा हक्क, माहितीचा हक्क, निवड करण्याचा अधिकार, म्हणणे मांडण्याचा हक्क, तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क व ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार या हक्कांची सामान्यांना जनजागृती व्हावी या उद्देशाने 24 डिसेंबर हा दिवस संबंध भारत भर राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणुन साजरा केला जात असल्याचे मध्य महा. प्रांत अध्यक्ष अ.भा. ग्राहक पंचायत बाळासाहेब औटी यांनी सांगितले.
त्याच अनुषंगाने आंबेगाव तहसिल कार्यालय येथील प्रशासकिय इमारतीमध्ये शुक्रवार दि 29 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी तहसीलदार संजय नागटिळक,आंबेगाव पं.स.सहाय्यक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, नायब तहसीलदार अनंता गवारी, संजय असवले, पुणे जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष अशोक भोर, जिल्हा कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर उंडे, तालुका संघटक देवीदास काळे, सचिव सुदाम भालेराव
रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमा प्रसंगी शासनाच्या विविध योजनांची, बँका, पतसंस्था, कृषी ,महसूल ,एसटी डेपो, यासंह अनेक शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी ग्राहकांचे हक्क व कर्तव्य याविषयी अधिक माहिती देण्यात आली .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पवार यांनी केले तर आभार रामदास पालेकर यांनी मानले.