गावागावातुन
पोंदेवाडी ( ता.आंबेगाव ) येथील गावाला पाणी पुरवठा करणार्या विहीरीवर सौरऊर्जा यंत्रणा बसवल्याने पाणीपुरवठा करणारे पंप सौरऊर्जेवर चालनार असुन विजबिलावरील खर्च वाचनार आहे.
निरगुडसर प्रतिनिधी ( राजु देवडे)
पोंदेवाडी ( ता.आंबेगाव ) येथील गावाला पाणी पुरवठा करणार्या विहीरीवर सौरऊर्जा यंत्रणा बसवल्याने गावाला विजेशिवाय पाणी मिळणार आहे.अनेक वेळा भारनियमन होत असते.त्यामुळे. या आज सौर ऊर्जेला महत्व प्राप्त झाले आहे. त्याचाच पोंदेवाडी येथील पाणीपुरवठा विजेविना सुरळीत सुरू राहाणार असून वीज बिलावरील खर्च वाचनार आहे.अशी माहिती सरपंच निलम वाळुंज,उपसरपंच महेंद्र पोखरकर यांनी दिली.
जल जीवन मिशन योजने अंतर्गत एक कोटी १० लाख रुपये खर्चाची सुधारित नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्याचे खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी सांगितले,
नवीन योजना कार्यान्वित झाली असून विहिरीवरील मोटारीसाठी विजेचा वापर न करता सौर ऊर्जेचे पॅनल बसवण्यात आले आहे. त्यावर साडेसात अश्वशक्तीची मोटार चालवण्यात येत आहे. यामुळे वीज बिलाचा खर्च वाचनार आहे. शिवाय विजेचीही बचत होणार आहे. पूर्वी वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यास पाणी पुरवठा योजना बंद पडत होतो. आता सौर ऊर्जेच्या पॅनेलमुळे योजना बंद पडणार नाही, जुन्या सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीवरील मोटारीसाठीही सौर ऊर्जेचे पॅनल बसवण्यात आल्याचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी सांगितले.