शैक्षणिक

वडगावपीर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अध्यक्ष पदी योगेश आदक , उपाध्यक्षपदी छाया गुळवे

Published

on

लोणी धामणी प्रतिनिधी
वडगावपीर ( ता.आंबेगाव ) येथील जि.प.शाळेच्या अध्यक्षपदी योगेश आदक,तर उपाध्यक्षपदी छाया गुळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
( दि.२१) रोजी शालेय समितीच्या मावळत्या अध्यक्षा सुवर्णा राजगुडे यांच्या अध्यक्षतेखाली सन2023 ते 2025 साठी शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली यावेळी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली. रवींद्र गुळवे,अण्णासाहेब पोखरकर, दत्तात्रय पोखरकर, दिगंबर आदक,संतोष गुळवे,आदिल मुजावर,ज्योती वाळुंज,दिपाली आदक,नजमा पठाण,सुप्रिया आदक,वैशाली शिंदे
सदस्य यांची बिन विरोध निवड करण्यात आली.


यावेळी माजी सरपंच संजय पोखरकर, मुख्याध्यापक भगवंत टाव्हरे, रमेश आदक, अण्णा साहेब आदक, रविंद्र गुळवे, एकनाथ आदक, उत्तम आदक, दता सांडभोर, दिगांबर आदक, दत्ता पोखरकर, मच्छिंद्र पोखरकर संतोष आदक उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष योगेश आदक आपल्या भाषणात म्हटले की, गावातील सर्वांच्या विश्वासला पात्र राहुन प्रामाणिक काम करणार असलेचे सांगितले . सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील विवेकदादा वळसे पाटील यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा शाळेसाठी निधी मिळवून देवू व शाळेचा नाव लौकिक वाढवू अशी ग्वाही दिली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गावडे सर, सुरेखा वाळुंज, वैशाली नाटे, शामल पोखरकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version