शैक्षणिक
काठापुर बु. येथील प्राथमिक शाळेमध्ये दहा गरजू विद्यार्थ्यांना लायन्स क्लब ऑफ आकुर्डी अग्रसेना यांच्या वतीने सायकलचे वाटप
काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दहा गरजू विद्यार्थ्यांना लायन्स क्लब ऑफ आकुर्डी अग्रसेना यांच्या वतीने सायकलचे वाटप करण्यात आले. शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यावेळी या सायकल देण्यात आल्या.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठावर बुद्रुक या ठिकाणी लायन्स क्लब आकुर्डी अग्रसेना यांच्या वतीने सायकल वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील पाचवी ते सातवी या तीन वर्गातील 10 गरजु विद्यार्थ्यांना या सायकल देण्यात आल्या. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले लायन्स क्लब आकुर्डीचे एमजेएफ लायन भीमसेन अगरवाल , लायन प्रेसिडेंट अशोक बंसल , लायन सेक्रेटरी अनिल कुमार अगरवाल, लायन ट्रेजर मोहनजी गर्ग, लायन हिमांशू गुप्ता, लायन राजेंद्र गुप्ता, लायन कृष्णकुमार गोयल, लायन पवन जी अगरवाल ,सरपंच अशोक करंडे,उपसरपंच पप्पू खुडे माजी उपसरपंच विशाल करंडे, शाळाव्यस्थापन कमेटी अध्यक्ष राहुल भुरके,काळुराम टिंगरे ,मुख्यध्यापक नंदकुमार चासकर,कुंडलिक जोरी,नवनाथ लोंढे,राघु करंडे, श्रावण निकम,प्रकाश शितोळे,पोपट कांबळे,सुरेश भागवत,उत्तम वाव्हळ,दिनेश तुळे,निलीमा वळसे.यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.लायन्स क्लबच्या वतीने दरवर्षी समाजातील वेगवेगळ्या गरजू लोकांना मदत केली जाते.तसेच शालेय साहित्याचे वाटप केले जाते. त्याचप्रमाणे ईतर सामाजिक उपक्रम राबवले जातात.जिल्हा परिषद शाळा काठापुर बुद्रुक येथील शाळेत, काठापुर बुद्रुक, काठापुर खुर्द ,पोंदेवाडी ,देवगाव येथून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात.त्यामुळे या विद्यार्थ्यांना येण्याजाण्यासाठी भविष्यात अजुन सायकल लायन्स क्लब उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले