शैक्षणिक
झाप काठापूर बुद्रुक शाळेत घेतला विद्यार्थ्यांनी बाजार उपक्रमातून घेतले व्यवहार ज्ञानाचे धडे
काठापुर बुद्रुक झाप येथील प्राथमिक शाळेत एक ते सातवी पर्यंत असुन.येथे बाल आनंद मेळावा या शासनाच्या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये बाजार हा उपक्रम राबवून इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी परिसरात उपलब्ध असणारे अथवा आपल्या घरच्या शेतात उपलब्ध असणारे कांदे, बटाटे ,आले ,मेथी, कोथिंबी, भोपळा , कवठ ,पालक ,हरभरा भाजी,मिरच्या, नारळ,भेंडी, कोथिंबीर, भाजके शेंगदाणे काकडी ,बोरे ,इत्यादी पालेभाज्या फळे भाज्या विकायला आणून विक्रीसाठी ठेवल्या, परिसरातील पालक वर्गांना शिक्षकांनी आव्हान करून या उपक्रमात पालकांनी सामील होण्याचे आवाहन केले. सर्व पालक वर्ग सुद्धा या लहान मुलांच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन खरेदीला मोठी झुंबड उडाली.सातवीच्या काही विद्यार्थ्यांनी ओली भेळ विकायला आणून चांगला नफा कमावला.जवळजवळ 7 ते 10 हजार रुपयाची उलाढाल या बाजार अंतर्गत झाली.उपक्रम संपल्यानंतर शिक्षकांनी सर्व मुलांचे त्यांनी केलेले गुंतवणूक एकूण झालेला नफा खरेदी विक्री तोटा इत्यादी मुलांचे अनुभव मुलांनी पालकांसमवेत शेअर केले.सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता बाजार संपल्यानंतर उरलेल्या पालेभाज्या मुलांनी शालेय पोषण आहारासाठी जमा केल्या.
हा वेगळ्या प्रकारचा मुलांसाठी उपक्रम शाळेमध्ये राबवल्यामुळे पालकांनीही अतिशय आनंद व्यक्त केला .हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक राजू जाधव,उपशिक्षक संजय घोटकर ,संतोष टाव्हरे, नन्ही कलीच्या शिक्षिका वर्षा जाधव यांनी नियोजन केले
मुलांच्या या बाजारामध्ये अनेक पालकांनी खरेदी केली तसेच बाजारासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर जाधव उपाध्यक्ष सचिन नऱ्हे ,माजी उपसरपंच विशाल करंडे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रवीण शेटे ,हौशीराम जाधव, सोमनाथ जाधव, अरविंद जाधव रूपाली ढोबळे ,जयश्री ढोबळे, उषा पवळे,अतुल पवळे लहू जाधव रूपाली नऱ्हे यांनी भेट देऊन शुभेच्या दिल्या.