Connect with us

गावागावातुन

भीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे

दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांचा सन २०२२-२३ करीता “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर झाला आहे. देशातील २०२२-२३ च्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणा-या कारखान्यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांच्यामार्फत देण्यात येणा-या पुरस्काराची मंगळवारी घोषणा करण्यात आली अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.


“देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” प्राप्त झाल्याबाबत माहिती देताना श्री. बाळासाहेब बेंडे म्हणाले की, पुरस्कारांचे मुल्यांकन करण्यासाठी ११ सदस्यांच्या तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात आली होती. त्यात केंद्रीय मुख्य संचालक (साखर) यांच्याशिवाय मुख्य संचालक, राष्ट्रीय सहकारी विकास मंडळ नवी दिल्ली, उप संचालक (साखर) नवी दिल्ली, संचालक राष्ट्रीय साखर संस्था, कानपुर, महासंचालक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, पंजाब, गुजरात, तामिळनाडू या राज्यांच्या साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक आणि इतर तज्ज्ञांचा समावेश आहे. पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्ली येथे ऑगस्टमध्ये होणार आहे.


महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक वर्षात केलेली ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, साखर उतारा, ऊस वाढीच्या योजना, कर्ज परतफेड, व्याज, खर्चात केलेली बचत, कमीत कमी उत्पादन खर्च, केलेली गुंतवणूक, वेळेत अदा केलेला ऊस दर, ऊस उत्पादकांना दिलेली ठेवीची पासबुके, संचित नफा, कारखान्याचे नक्त मुल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा, कारखान्याने उभारणी केलेला व उपलब्ध निधी, विनियोगासाठी केलेले नियोजन, शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेली कामे या सर्व बाबींचा विचार करून कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.


कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ यामुळेच पुरस्कार प्राप्त करणे शक्य झाले आहे. यापूर्वी कारखान्यास देश पातळीवरील १३ व राज्य पातळीवरील १४ असे एकूण २७ पुरस्कार प्राप्त झालेले आहे. “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” ६ वेळा मिळविणारा देशातील पहिला साखर कारखाना आहे. अशी माहिती व्हाईस चेअरमन श्री. प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.
कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांनी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे मा. संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

काठापुर बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी.

Published

on

मंचर –

छत्रपती शिवाजी महाराज जयंती काठापूर बुद्रुक येथे शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात आली.यावेळी किल्ले शिवनेरीवरून आणलेल्या शिवज्योतीची मिरवणूक गावातून काढण्यात आली.

काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात येते. याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी किल्ले शिवनेरी ते काठापुर बुद्रुक शिवज्योत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व शिवज्योतीची गावातुन मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सरपंच अशोक करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत थोरात,पोलीस पाटील अमोल करंडे,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सागर शेटे, श्वेता करंडे,मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, संतोष करंडे, एकनाथ ढमाले, योगेश करंडे, बजरंग करंडे,मयुर जाधव, समीर करंडे, कैलास टिंगरे,ओंकार पवार, विनायक नरे, अविनाश भागवत, त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Continue Reading

गावागावातुन

काठापूर बुद्रुक यात्रेत घाटाचा राजा पुरस्कार किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मिळवला.

Published

on

मंचर-

महाशिवरात्री यात्रा उत्सवा निमित्त काठापुर बुद्रुक या ठिकाणी आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला. यावेळी बैलगाडा मालकांना एकूण.१५२००० ईनाम वाटप करण्यात आला.

काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला.
घाटाचा राजा म्हणून किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मान मिळवला.प्रथम क्रमांक फळीफोडचा मान रुंद्रांश दाते/बारकु जगताप, निलेश गाडगे यांनी तर फायनल मध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्ण वाव्हळ,उमेश भोर /निलेश वाघ यांनी द्वितीय क्रमांक सुभाष वाळुंज, मधुकर जोरी/राजु जोरी यांनी पटकावला,तृतीय क्रमांक किशोर करंडे/ प्रकाश मेचे,कै.तुकाराम जाधव यांनी मिळवला.
यावेळी यात्रेची व्यवस्था अध्यक्ष किशोर करंडे, उपाध्यक्ष अशोक जोरी, मंगेश करंडे,काळुराम टिंगरे,अशोक करंडे, विशाल करंडे,अमोल करंडे, संतोष करंडे, राहुल भुरके, महादेव करंडे, लक्ष्मण करंडे,नवनाथ लोंढे, एकनाथ ढमाले,मनोज करंडे,बारकु जगदाळे,अक्षय गायकवाड, सचिन जाधव, अमित जाधव, शिवाजी करंडे राहुल भुरके यांसह ग्रामस्थांनी पाहीली.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती देवदत्त निकम, भिमाशंकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, अंकिता वाळुंज यांनी भेट दिली.

Continue Reading

गावागावातुन

जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या असुन वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

Published

on

मंचर-

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडून या निवडणुकांचे मतमोजणी होऊन निकाल घोषित झाले.यामध्ये आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आले असून वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

 पुणे जिल्हा परिषद व आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या निवडणुका अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पार पडल्या या निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या.आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात सर्वपक्षीय आघाडी असा सामना रंगला होता.यावेळी सर्वच मतदारसंघांमध्ये निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या. घोडेगाव,पेठ,बोरघर,शिनोली,अवसरी, पिंपळगाव, पारगाव,जारकरवाडी, कळंब ,रांजणी या जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये मोठ्या प्रमाणात लढती चुरशीच्या झाल्या.यामध्ये जारकरवाडी पंचायत समिती गणातून कुमारी अंकिता अनिल वाळुंज या चांगली मते मिळवून विजयी झाल्या आहेत. 

    निवडणूक साठी पात्रता ही 21 वर्षाची आहे अंकिता वाळूंज या वयाच्या 22 व्या वर्षी पंचायत समितीमध्ये निवडून आल्या आहेत. त्यांचे शिक्षण बी फार्मसी झाले असून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडील अनिल वाळूंज यांचा राजकीय वारसा चालवत त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला.
माघील चार ते पाच महिन्यापासून पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आधी गावोगावी घरोघरी जाऊन त्यांनी जनसंपर्क वाढवला व या जोरावर त्या कमी वयामध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून आंबेगाव तालुक्यातून निवडून आल्या आहेत.
Continue Reading

Trending