Connect with us

महाराष्ट्र

भीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार” प्रदान

Published

on

मंचर – दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राज्यातील साखर उद्योगातील अग्रेसर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु, यांचा सन २०२३-२४ करीता मध्य विभागातील “सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार” देशाचे माजी कृषीमंत्री व वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे अध्यक्ष मा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.


गुरुवार (दि. २३) वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी बु., येथे ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये राज्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना सन २०२३-२४ गाळप हंगामासाठी सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना, सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कर, सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन, सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कर, शेतकरी ऊस भूषण पुरस्कार, सहकारी साखर कारखान्यांचे अधिकारी यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे उपाध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, विस्माचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे संचालक मंडळ व महासंचालक संभाजी कडू पाटील, सल्लागार शिवाजीराव देशमुख तसेच साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते.


पुरस्कार कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर, शांताराम हिंगे, मच्छिंद्र गावडे, अंकित जाधव, अरुण चासकर, बाजीराव बारवे, सिताराम लोहोट, ज्ञानेश्वर अस्वारे, नितीन वाव्हळ, रामहरी पोंदे, पोपटराव थिटे, पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे यांनी स्विकारला.
याबाबत अधिक माहिती देताना बेंडे म्हणाले कारखान्याचे संस्थापक दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्षेत्रात व परिसरात ऊस उत्पादन वाढीसाठी ऊस बेणेबदल आणि बेणेमळा योजनेवर भर, एक डोळा पध्दतीने ऊस रोप लागवड, शेतकरी मेळावे व प्रशिक्षण यांचे आयोजन, माती व पाणी परीक्षण सुविधा उपलब्ध, ठिबक सिंचन वाढीसाठी प्रयत्न, हुमणी किड नियंत्रणासाठी भुंगेरे गोळा करणे, व्हि.एस.आय. निर्मित निविष्ठाचा वापर, जैविक खते निर्मिती प्रकल्पामार्फत जैविक खते पुरवठा, रासायनिक खतांचा पुरवठा, खोडवा पीक व्यवस्थापन, पाचट कुट्टी करणेसाठी विशेष प्रयत्न, ऊस विकास योजनेसाठी भरीव रक्कमेची तरतुद, दत्तात्रय वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ या स्वतंत्र ऊस विकास योजनेची मागील ६ वर्षापासून अंमलबजावणी या सर्व बाबींचा विचार करुन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु यांनी गाळप हंगाम २०२३-२४ करीता सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार देण्यात आला आहे.
सदर पुरस्कार प्राप्त होणेस कारखान्याचे संस्थापक दिलीपराव वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचा-यांचे सुयोग्य व्यवस्थापन, सभासद व ऊस उत्पादक शेतकरी वर्गाची साथ यामुळेच शक्य झाले असल्याची माहिती व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

थापलिंग यात्रेला उत्साहात प्रारंभ, पहिल्या दिवशी एक लाख भाविकांनी घेतले खंडोबा देवाचे दर्शन.

Published

on

पारगाव:

नागापूर (ता. आंबेगाव) येथील प्रसिद्ध श्री थापलिंग यात्रेला आज शनिवारी (दि. ३)भक्तिभावाच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्याच दिवशी सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले. “सदानंदाचा येळकोट” असा जयघोष करून पारंपरिक तळीभंडार केला.
पौष पौर्णिमेला थापलिंग गडावर दोन दिवस मोठी यात्रा भरते. यंदा यात्रा शनिवारी रविवारी सुट्ट्यांच्या दिवशी आल्याने पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. सकाळपासूनच गडावर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. राज्याच्या विविध भागांतून तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यात्रेसाठी दाखल झाले होते. अनेक भाविकांनी आपल्या नवसपूर्तीसाठी बैलगाडे घाटात पळवले. तर काही भाविकांनी जागरण करून कुलाचार पूर्ण करून श्री खंडोबा देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. “येळकोट येळकोट जय मल्हार”च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दुपारी गडावर रांजणी वळती येथील खुडे बंधूंच्या काठीपालख्या वाजत गाजत आल्या.
यात्रेच्या पहिल्या दिवशी सुमारे एक लाख भाविकांनी श्री खंडोबा देवाचे दर्शन घेतल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली.भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांग, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा तसेच वाहतूक नियंत्रणाची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त गडावर ठेवण्यात आला आहे.
थापलिंग गडावर जिलेबी भजी हॉटेल, रसवंतीगृहे, गरम कपड्यांची दुकाने, खेळण्याची दुकाने , आकाशी पाळणे, लहान मुलांसाठी पाळणे मोठ्या प्रमाणावर व्यवसायिकांनी लावले आहेत.
रविवारी भरयात्रेचा दिवस असल्याने अजून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असून संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण आहे. पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत व स्वयंसेवकांच्या सहकार्याने शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने यात्रा पार पडावी. यासाठी थापलींग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नागापूर ग्रामस्थ अथक परिश्रम घेत आहेत.

नागापूर (ता.आंबेगाव)येथील थापलिंग गडावर खंडोबा देवाच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला.

Continue Reading

गावागावातुन

थापलिंग खंडोबा मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर लोकवर्गणीतून तीन कोटी रुपये खर्चून होणार मंदिर.

Published

on

मंचर :

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नागापूर (ता. आंबेगाव )येथील थापलिंग खंडोबा देवाच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. लोकवर्गणी, देणगीतून सुमारे तीन कोटी रुपये खर्चून खंडोबा देवाचे मंदिर उभे राहणार आहे.अशी माहिती थापलिंग देवस्थान ट्रस्टने दिली.
थापलिंग गडावर खंडोबा देवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी अनेक भाविकभक्तांची मागणी होती. देवस्थान ट्रस्टने गतवर्षापासून मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे काम सुरू केले. मंदिरासाठी तीन कोटी रुपये खर्च होणार आहे. मंदिराचे संपूर्ण काम हे देगलूर काळा पाषाण या दगडामध्ये होणार आहे. हा दगड नांदेड येथून उपलब्ध केला आहे. जमिनीपासून सुमारे ६५ फूट उंचीचे हे मंदिर होणार आहे. थापलिंग गड हा उंचीवर आहे. त्यामुळे हे मंदिर गडाच्या चोहोबाजूंनी सहज दिसणार आहे. मंदिरासाठी नागापूर ग्रामस्थांनी मानसी दोन हजार रुपये वर्गणी गोळा केली आहे. येत्या वर्षभरात मंदिराचे काम पूर्ण होईल. मंदिरासाठी मोठा निधी आवश्यक आहे यासाठी भाविक भक्तांनी मंदिराच्या कामासाठी सढळ हाताने मदत करावी. असे आवाहन थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी केले आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून विवाहांचे बुकिंग सुरू-: श्री. क्षेत्र. थापलिंग गडावर लग्न समारंभासाठी १५० बाय ८० फूट आकाराचा सभामंडप उभारण्यात आला आहे. सुमारे १२ हजार स्क्वेअर फुट आकाराच्या सभामंडपात गोरगरिबांची लग्न होणार आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून विवाहाच्या तारखांचे बुकिंग सुरू होणार आहे. गोरगरिब कुटुंबांना चांगला फायदा होणार आहे.

 नागापूर (ता.आंबेगाव) येथील थापलिंग गडावर सुरू असलेले खंडोबा देवाचे मंदिर.
Continue Reading

गावागावातुन

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी सोमवारी रास्ता रोको व गावबंद आंदोलन.

Published

on

मंचर-

पिंपरखेड ता शिरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात कु.रोहन विलास बोंबे वय वर्ष-१३ या बालकाचा मृत्यू झाल्याने.व मागील एक महिन्यात तीन व्यक्तींचे मृत्यू बिबट्याच्या हल्यात झाल्याने मंचर अवसरी फाटा येथील नंदि चौकात पुणे नाशिक महामार्ग सोमवार दिनांक ०३/११/२०२५ रोजी सकाळी १० वाजता रोखण्यात येणार आहे.
यावेळी जुन्नर, आंबेगाव, शिरूर खेड तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहनार आहेत.
त्याचप्रमाणे सोमवार दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थ गाव बंद आंदोलन करणार आहेत.

Continue Reading

Trending