Connect with us

महाराष्ट्र

भीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार २०२२-२३” व “तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार” जाहिर

Published

on

निरगुडसर (राजु देवडे)
दत्तात्रयनगर ( पारगाव तर्फे अवसरी बु,) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राज्यातील साखर उद्योगातील अग्रेसर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु, यांचा सन २०२२-२३ करीता मध्य विभागातील प्रथम क्रमांकाचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार २०२२-२३” व मध्य विभागातील द्वितीय क्रमांकाचा “तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार” जाहीर झाले आहे. राज्यातील २०२२-२३ च्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणा-या कारखान्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हि.एस.आय.) यांच्यामार्फत देण्यात येणा-या पुरस्काराची शुक्रवार घोषणा करण्यात आली अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु, यांची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी केंद्रीय कृषीमंत्री व संस्थेचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली होत असून पुरस्काराचे वितरणही श्री. पवार यांचे हस्ते गुरुवार (दि. ११) सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.
पुरस्कार प्राप्त झाल्याबाबत माहिती देताना श्री. बेंडे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखरेचा प्रति क्विंटल रोखीचा उत्पादन प्रक्रिया खर्च तसेच एकूण उत्पादन प्रक्रियेचा खर्च व खेळते भांडवलावरील व्याजाचा खर्च राज्याच्या सरासरी खर्चापेक्षा कमी आहे. इतर कारखान्याच्या तुलनेत स्टोअर खरेदी व्यवस्थापन चांगले असल्याने उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार २०२२-२३ करिता निवड झाली आहे.
तसेच मिलमधील उसाचा तंतुमय निर्देशांक, रिड्युस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन, साखर तयार करण्यासाठी लागणा-या वाफेचा व विजेचा कमीत कमी वापर, साखर उत्पादन प्रक्रीयेमध्ये बगॅस वापर कमी आहे. गाळप क्षमतेचा वापर योग्य प्रकारे करून बगॅस बचत, साखरेच्या व्येयामध्ये घट व देखभाल दुरुस्ती खर्चात काटकसर केल्याने तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
सदर पुरस्कार प्राप्त होणेस कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचा-यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक शेतकरी व सभासद वर्गाची साथ यामुळेच शक्य झाले आहे. कारखान्यास देश पातळीवरील १२ व राज्य पातळीवरील १४ असे एकूण २६ पुरस्कार प्राप्त झालेले आहे. देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार ५ वेळा प्राप्त करणारा एकमेव कारखाना ठरला असल्याची माहिती व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

थापलिंग यात्रेला उत्साहात प्रारंभ, पहिल्या दिवशी एक लाख भाविकांनी घेतले खंडोबा देवाचे दर्शन.

Published

on

पारगाव:

नागापूर (ता. आंबेगाव) येथील प्रसिद्ध श्री थापलिंग यात्रेला आज शनिवारी (दि. ३)भक्तिभावाच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्याच दिवशी सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले. “सदानंदाचा येळकोट” असा जयघोष करून पारंपरिक तळीभंडार केला.
पौष पौर्णिमेला थापलिंग गडावर दोन दिवस मोठी यात्रा भरते. यंदा यात्रा शनिवारी रविवारी सुट्ट्यांच्या दिवशी आल्याने पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. सकाळपासूनच गडावर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. राज्याच्या विविध भागांतून तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यात्रेसाठी दाखल झाले होते. अनेक भाविकांनी आपल्या नवसपूर्तीसाठी बैलगाडे घाटात पळवले. तर काही भाविकांनी जागरण करून कुलाचार पूर्ण करून श्री खंडोबा देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. “येळकोट येळकोट जय मल्हार”च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दुपारी गडावर रांजणी वळती येथील खुडे बंधूंच्या काठीपालख्या वाजत गाजत आल्या.
यात्रेच्या पहिल्या दिवशी सुमारे एक लाख भाविकांनी श्री खंडोबा देवाचे दर्शन घेतल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली.भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांग, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा तसेच वाहतूक नियंत्रणाची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त गडावर ठेवण्यात आला आहे.
थापलिंग गडावर जिलेबी भजी हॉटेल, रसवंतीगृहे, गरम कपड्यांची दुकाने, खेळण्याची दुकाने , आकाशी पाळणे, लहान मुलांसाठी पाळणे मोठ्या प्रमाणावर व्यवसायिकांनी लावले आहेत.
रविवारी भरयात्रेचा दिवस असल्याने अजून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असून संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण आहे. पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत व स्वयंसेवकांच्या सहकार्याने शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने यात्रा पार पडावी. यासाठी थापलींग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नागापूर ग्रामस्थ अथक परिश्रम घेत आहेत.

नागापूर (ता.आंबेगाव)येथील थापलिंग गडावर खंडोबा देवाच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला.

Continue Reading

गावागावातुन

थापलिंग खंडोबा मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर लोकवर्गणीतून तीन कोटी रुपये खर्चून होणार मंदिर.

Published

on

मंचर :

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नागापूर (ता. आंबेगाव )येथील थापलिंग खंडोबा देवाच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. लोकवर्गणी, देणगीतून सुमारे तीन कोटी रुपये खर्चून खंडोबा देवाचे मंदिर उभे राहणार आहे.अशी माहिती थापलिंग देवस्थान ट्रस्टने दिली.
थापलिंग गडावर खंडोबा देवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी अनेक भाविकभक्तांची मागणी होती. देवस्थान ट्रस्टने गतवर्षापासून मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे काम सुरू केले. मंदिरासाठी तीन कोटी रुपये खर्च होणार आहे. मंदिराचे संपूर्ण काम हे देगलूर काळा पाषाण या दगडामध्ये होणार आहे. हा दगड नांदेड येथून उपलब्ध केला आहे. जमिनीपासून सुमारे ६५ फूट उंचीचे हे मंदिर होणार आहे. थापलिंग गड हा उंचीवर आहे. त्यामुळे हे मंदिर गडाच्या चोहोबाजूंनी सहज दिसणार आहे. मंदिरासाठी नागापूर ग्रामस्थांनी मानसी दोन हजार रुपये वर्गणी गोळा केली आहे. येत्या वर्षभरात मंदिराचे काम पूर्ण होईल. मंदिरासाठी मोठा निधी आवश्यक आहे यासाठी भाविक भक्तांनी मंदिराच्या कामासाठी सढळ हाताने मदत करावी. असे आवाहन थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी केले आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून विवाहांचे बुकिंग सुरू-: श्री. क्षेत्र. थापलिंग गडावर लग्न समारंभासाठी १५० बाय ८० फूट आकाराचा सभामंडप उभारण्यात आला आहे. सुमारे १२ हजार स्क्वेअर फुट आकाराच्या सभामंडपात गोरगरिबांची लग्न होणार आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून विवाहाच्या तारखांचे बुकिंग सुरू होणार आहे. गोरगरिब कुटुंबांना चांगला फायदा होणार आहे.

 नागापूर (ता.आंबेगाव) येथील थापलिंग गडावर सुरू असलेले खंडोबा देवाचे मंदिर.
Continue Reading

गावागावातुन

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी सोमवारी रास्ता रोको व गावबंद आंदोलन.

Published

on

मंचर-

पिंपरखेड ता शिरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात कु.रोहन विलास बोंबे वय वर्ष-१३ या बालकाचा मृत्यू झाल्याने.व मागील एक महिन्यात तीन व्यक्तींचे मृत्यू बिबट्याच्या हल्यात झाल्याने मंचर अवसरी फाटा येथील नंदि चौकात पुणे नाशिक महामार्ग सोमवार दिनांक ०३/११/२०२५ रोजी सकाळी १० वाजता रोखण्यात येणार आहे.
यावेळी जुन्नर, आंबेगाव, शिरूर खेड तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहनार आहेत.
त्याचप्रमाणे सोमवार दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थ गाव बंद आंदोलन करणार आहेत.

Continue Reading

Trending