गावागावातुन
पारगाव शिंगवे (ता.आंबेगाव) या ठिकाणी जलजीवन मिशन योजनेचा टप्पा क्रमांक ४ च्या संदर्भात दोन दिवस प्रशिक्षण संपन्न.
मंचर – केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन योजना सुरू आहे.या योजनेच्या माध्यमातून पाणीस्रोतांचे बळकटी करण करुन वर्षभर पुरेल एवढ्या पाण्याचे नियोजन केले पाहिजे असे मत यशदाचे प्रविण प्रशिक्षक सूर्यकांत शिवले यांनी व्यक्त केले.
पारगाव शिंगवे (तालुका आंबेगाव) या ठिकाणी जलजीवन मिशन योजनेचा टप्पा क्रमांक ४ च्या संदर्भात दोन दिवस प्रशिक्षण आयोजित केले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रविण प्रशिक्षक रविराज पाटील, जयदेव साळवे यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे समन्वय प्रणिता भालेकर सचिन कुचेकर यांनी केले यावेळी काठापूरचे सरपंच अशोक करंडे, पारगावच्या सरपंच श्वेता ढोबळे, जवळेच्या सरपंच वृषाली शिंदे, यांसह परीसरातील गावांमधील सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत अधिकारी ,कर्मचारी,आशा सेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद पुणे ,पंचायत समिती आंबेगाव यांच्या माध्यमातून,साईप्रेम ग्रामीण विकास संस्था यवतमाळ यांच्या सहकार्याने हे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते.दोन दिवस या शिबिराच्या माध्यमातून जलस्रोतांचे बळकटीकरण व शाश्वतीकरण, वर्षभर 365 दिवस पाणी पुरेल यासंदर्भात नियोजन, पावसाचे पडणारे पाणी अडवने ते जमिनीत जिरवने, जमिनीतील पाणी पातळी कशी वाढवायची,पाण्याचे काटकसरीने वापर कसा केला पाहिजे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.