गावागावातुन
निरगुडसर विद्यालयात वृक्षारोपन व सायकल वाटप.
निरगुडसर प्रतिनिधी राजु देवडे
प्रत्येक विद्यार्थ्याने जिवनात आत्मविश्वासाने,जिद्दीने मनलावून अभ्यास केला तर जीवनातील संघर्षात कोणतीही परीक्षा असो त्या परिक्षेत विद्यार्थी यशसवी होणारच असे प्रतिपादन उप महाप्रबंधक एवं क्षेत्रीय प्रमुख पुणे जिल्हा क्षेत्र, बॅक ऑफ बडोदा शब्बीर मेहसानीया यांनी केले.
निरगुडसर ( ता.आंबेगाव) येथील पंडीत जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात बॅक ऑफ बडोद्याच्या ११७ व्या वर्धापन दिना निमित्त गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून येथील गरजु विद्यार्थ्यांना दहा सायकलचे वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बॅक ऑफ बडोदा अवसरी खुर्द शाखेचे शाखा प्रबंधक सचिन नाईकवाडे,खेडचे शाखा प्रबंधक दयानंद प्रसाद,क्षत्रिय कार्यालय पुणे वरिष्ठ प्रबंधक कांतीलाल बाविस्कर,वरिष्ठ प्रबंधक मंगेश कुंभार तसेच संस्थेचे सचिव प्रकाश तापकीर,संचालक श्रीकांत पवार,माजी प्राचार्या सुनंदा गोरे उपस्थितीत होते.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरुजनांचा सत्कार करण्यात आला.या वेळी शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.या सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य कांताराम टाव्हरे यांनी केले,सूत्रसंचालन मोहन दरेकर व आभार पर्यवेक्षक संतोष वळसे यांनी केले.
गावागावातुन
काठापुर बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी.
मंचर –
छत्रपती शिवाजी महाराज जयंती काठापूर बुद्रुक येथे शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात आली.यावेळी किल्ले शिवनेरीवरून आणलेल्या शिवज्योतीची मिरवणूक गावातून काढण्यात आली.
काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात येते. याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी किल्ले शिवनेरी ते काठापुर बुद्रुक शिवज्योत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व शिवज्योतीची गावातुन मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सरपंच अशोक करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत थोरात,पोलीस पाटील अमोल करंडे,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सागर शेटे, श्वेता करंडे,मुख्याध्यापक नंदकुमार चासकर, संतोष करंडे, एकनाथ ढमाले, योगेश करंडे, बजरंग करंडे,मयुर जाधव, समीर करंडे, कैलास टिंगरे,ओंकार पवार, विनायक नरे, अविनाश भागवत, त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
गावागावातुन
काठापूर बुद्रुक यात्रेत घाटाचा राजा पुरस्कार किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मिळवला.
मंचर-
महाशिवरात्री यात्रा उत्सवा निमित्त काठापुर बुद्रुक या ठिकाणी आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला. यावेळी बैलगाडा मालकांना एकूण.१५२००० ईनाम वाटप करण्यात आला.
काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला.
घाटाचा राजा म्हणून किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मान मिळवला.प्रथम क्रमांक फळीफोडचा मान रुंद्रांश दाते/बारकु जगताप, निलेश गाडगे यांनी तर फायनल मध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्ण वाव्हळ,उमेश भोर /निलेश वाघ यांनी द्वितीय क्रमांक सुभाष वाळुंज, मधुकर जोरी/राजु जोरी यांनी पटकावला,तृतीय क्रमांक किशोर करंडे/ प्रकाश मेचे,कै.तुकाराम जाधव यांनी मिळवला.
यावेळी यात्रेची व्यवस्था अध्यक्ष किशोर करंडे, उपाध्यक्ष अशोक जोरी, मंगेश करंडे,काळुराम टिंगरे,अशोक करंडे, विशाल करंडे,अमोल करंडे, संतोष करंडे, राहुल भुरके, महादेव करंडे, लक्ष्मण करंडे,नवनाथ लोंढे, एकनाथ ढमाले,मनोज करंडे,बारकु जगदाळे,अक्षय गायकवाड, सचिन जाधव, अमित जाधव, शिवाजी करंडे राहुल भुरके यांसह ग्रामस्थांनी पाहीली.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती देवदत्त निकम, भिमाशंकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, अंकिता वाळुंज यांनी भेट दिली.
गावागावातुन
जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या असुन वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.
मंचर-
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडून या निवडणुकांचे मतमोजणी होऊन निकाल घोषित झाले.यामध्ये आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी पंचायत समिती गणातील कुमारी अंकिता अनिल वाळूंन या सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून निवडून आले असून वयाच्या 22 व्या वर्षी त्या पंचायत समिती सदस्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक होत आहे.

पुणे जिल्हा परिषद व आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या निवडणुका अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पार पडल्या या निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या.आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात सर्वपक्षीय आघाडी असा सामना रंगला होता.यावेळी सर्वच मतदारसंघांमध्ये निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या. घोडेगाव,पेठ,बोरघर,शिनोली,अवसरी, पिंपळगाव, पारगाव,जारकरवाडी, कळंब ,रांजणी या जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये मोठ्या प्रमाणात लढती चुरशीच्या झाल्या.यामध्ये जारकरवाडी पंचायत समिती गणातून कुमारी अंकिता अनिल वाळुंज या चांगली मते मिळवून विजयी झाल्या आहेत.
निवडणूक साठी पात्रता ही 21 वर्षाची आहे अंकिता वाळूंज या वयाच्या 22 व्या वर्षी पंचायत समितीमध्ये निवडून आल्या आहेत. त्यांचे शिक्षण बी फार्मसी झाले असून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडील अनिल वाळूंज यांचा राजकीय वारसा चालवत त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला.
माघील चार ते पाच महिन्यापासून पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आधी गावोगावी घरोघरी जाऊन त्यांनी जनसंपर्क वाढवला व या जोरावर त्या कमी वयामध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार म्हणून आंबेगाव तालुक्यातून निवडून आल्या आहेत.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
गावागावातुन5 months agoभीमाशंकरकडून रु. १७५/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
